समर्थ व्हॉट्सॲपग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत

◾️धावपटु तेजस्वीनी लांबकाने यांना आर्थिक मदत

◾️डॉ.चंद्रकांत निंबारते आणि मित्रांचा पुढाकार

लाखनी 09: स्थानिक लाखनी येथील समर्थ विद्यालयातील 1989 – 91 बॅच मध्ये शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एथलेटिक्समध्ये खेळायला जाणारी धावपटु तेजस्वीनी लांबकाने हिला नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय धाव स्पर्धेत जाण्यासाठी आर्थिक मदत करून समाजऋण सध्या केले आहे.

या आधी या ग्रुप च्या माध्यमातून समाजातील गरीब होतकरू महिला, विद्यार्थी, अनाथ आणि विधवांना वेळोवेळी मदत केली जाते. मागील वर्षी समाजात महिलांना शिलाई मशीन वितरण करण्यात आले होते.

या बॅच मधील विद्यार्थी उच्च पदस्थ आणि देश विदेशात असून समाजासाठी नेहमीच काम करीत असतात. आज धावपटु तेजस्वीनी लांबकाने हिला नेपाळ येथे आयोजीत धावण्याच्या स्पर्धेत आर्थिक अडचणीत भाग घेता येत नव्हते त्यांनी डॉ चंद्रकांत निंबारते यांना भेटून आपली अडचण सांगितली आणि लगेचच त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्रांशी सल्ला मसलत करून डॉ चंद्रकांत निबार्ते, डॉ मनीषा निबार्ते, डॉ गणेश मोटघरे, श्रीधर काकिरवार, प्रीती पाटील, गिरीष लांजेवार यांच्या हस्ते धावपटु तेजस्वीनी लांबकाने धनादेश दिला.

Print Friendly, PDF & Email
Share