नगरपंचायत देवरीच्या कार्यप्रणालीमुळे देवरीवाशी त्रस्त

◾️उघड्या नाल्यामुळे अपघातात वाढ, जनसामान्यांनी दाद मागायची कुठे ?

देवरी 16: स्वच्छ सर्वेक्षण, आपली देवरी- सुंदर देवरी , माझी वसुंधरा आदी उपक्रम राबवून स्वच्छतेचे आणि विकासाचे धिंडोरे पिटणाच्या नगरपंचातीच्या कार्यप्रणालीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

देवरी नगरात गर्दीचे वाढते प्रमाण असून विविध विभागातील अधिकारी , कर्मचारी या ठिकाणी प्रत्येक प्रभागात वास्तव्यास असून रहदारी वाढलेली आहे. शहरातील नाल्यावरील झाकण नसल्यामुळे अपघातांची समस्या वाढलेली असून वाहनांचे मोठे नुकशान होत असल्याचे चित्र आहे. संबंधित घटनांची तक्रार करून सुद्धा नगरपंचात प्रशासन याकडे जातीने दुर्लक्ष करीत असून प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

लाखो रुपयाचा निधी खर्च करून देवरी शहराला सुशोभित करण्यात आले परंतु ‘स्वच्छ देवरी सुंदर देवरी’ उपक्रम फेल असल्याचे चित्र समोर आले आहे. सुशोभित केलेल्या जागावर बॅनर , दुकानांचे बोर्ड लागले असून, निर्माण केलेल्या प्रतिकृतीवर गवत वापले असून कुणाचे याकडे लक्ष नाही हे सिद्ध होत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच चौकात बसविलेल्या शुद्ध पाण्याचे वाटर कुलर , सार्वजनिक मैदाने , मुतारी , नगरपंचायतच्या उजवीकडील परिसर , अंगणवाडी , सुशोभित केलेले स्थळ दुर्लक्षामुळे सुंदर देवरीचे स्वप्न भंगले कि काय ? असा सवाल नागरिक करीत आहेत.

सूचना आणि तक्रार केल्यावर यापुढे नगरपंचायत प्रशासन जनसामान्यांच्या समस्या आता तरी सोडवेल का ? नाल्यावरील झाकण बसून अपघात कमी करण्यास सक्षम ठरेल का ? असे प्रश्न सध्या निरुत्तरित आहेत.

Share