डोळ्यात मिरचीपावडर टाकून २२ लाख लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.

◾️कारचालक निघाला मुख्य सूत्रधार, सिनेस्टाइल ने चक्क लुटले 22 लाख रुपये

साकोली 29– तेलंगाना राज्यातील धान्य व्यापायांचे दिवानजी त्याच्या चालकासह साकोली तालुक्यातील पळसगाव, गोंडउमरी येथील राईसमिल मालकाकडून वसुली करून निघाले असता त्यांच्या वैगनरला कार ला सिनेस्टाईलरित्या अडकवून दिवानजीच्या डोळ्यात मिरचीपावडर उडवून शस्त्राचा धाक दाखवित २२ लाख ६९ हजाराने लूटणाया आरोपींना साकोली पोलीसांनी जलद तपासचक्रे फिरवित जेरबंद करून २२ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम मुद्देमालासह हस्तगत केली आहे.

सदर घटना २७ जुलै रोजी रात्री १० वा. पळसगाव गोंडउमरी मार्गावर घडली होती. तेलंगाना राज्यातील व्यापारी भंडारा गोंदिया जिल्ह्यात धानविक्री करतात आठवडा – दोन आठवड्यात एकदा धानाचे वसुली करण्यासाठी दिवानजीला पाठवितात. अशातच हैदराबाद येथील एका व्यापा-याने आपला दिवानजी मासेठी सिलीयान याला चालक रामदास हरीदास भारकड सह वैगनर क्र. एमएच ४९ एएस ८३९६ ने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील वसुलीसाठी पाठविले होते, त्यांनी गोंदिया येथील एका व्यापा-याकडून वसुली केल्यानंतर ते साकोलीतील पळसगाव येथील एका राईसमिल मालकाकडून वसुली केल्यानंतर हैदराबादकडे जाण्यास निघाले असता त्यावेळी त्यांकडे वसुलीचे २२ लाख ६९ हजार रू. ची रोकड होती व्यापा-याचा दिवानजी व चालक दोघेही गोंडउमरी पळसगाव मार्गाने परत जात असता, रस्त्यात एक व्यक्ती खाली पडून असलेला दिसला, पडलेला व्यक्ती दिसताच कारचालकाने थांबून खाली उतरले, उतरताच ८ व्यक्तींनी दिवानजीच्या डोळ्यात मिरचीपावडर झोकून लूटले होते.

एवढंच नाही तर कारचे टायर शस्त्राने पंक्चर करीत पोबारा केला, या घटनेचा तपास साकोली पोलीसांनी केल्यावर या घटनेत आरोपी रामदास काशिनाथ भारकड ४० रा. आंबेनगर पारडी नागपुर, चेतन लूंगाराम शिवणकर २५ रा. धर्मापुरी ता. साकोली, रेकराम प्रभु सोनटक्के ३२, शशीकूमार ताराचंद सोनटक्के, आशिष नंदकूमार कळपते २५, संजय आत्माराम राणे २५ सर्व रा. मक्कीटोला, देवेंद्र उर्फ गुड्डू गोपीचंद सोनटक्के रा. आंबेनगर पारडी नागपुर, प्रकाश उर्फ सोनू अशोक चिचोलकर २४ रा. दसरा रोड महाल नागपुर अशी आरोपींची नावे आहेत.

या घटनेपूर्वी आरोपींनी असेच लूटमार केले आहे का.? याचाही तपास साकोली पोलीस करीत असून आरोपींवर कलम ३९५, ३९७, भादवि नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला असून या प्रकरणात दिवानजी जवळ रक्कम असल्याचा आरोपींना सुगावा लागलाच कसा याही दिशेने पोलीस कसून चौकशी करीत असून सर्व आरोपींना पीसीआर व कोठडी दिली असून पुढील पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत. यातील आरोपींना साकोली न्यायालयात हजर केले असता कारचालक रामदास भारकड यास ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अन्य सातही आरोपींना न्यायालयाने पीसीआर कोठडीत रवानगी केली.

Print Friendly, PDF & Email
Share