?अवैद्य रेती तस्करांवर पुन्हा 3 लक्ष 52 हजाराचे दंड

♦️देवरी तालुका प्रशासन गुंगीत नसून ऍक्शन मोड मध्ये असल्याचे सिद्ध

♦️काल (27 मे ) 92 लक्ष 65 हजार 800 रूपयाचे दंड व चौकशी चे आदेश

देवरी 28: तालुक्यात सध्या अवैध उत्तखन प्रकरणावर तालुका प्रशासनाला धारेवर धरून गुंगीत असल्याचे चर्चा चालल्या असतांना देवरी तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी अवैद्य उत्तखनन करणारे आणि अवैद्य गौण खनिज साठविणारे तसेच अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्यावर ताबोडतोब कार्यवाही करून तालुका प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे.

देवरीतील अवैध गौणखनिज तस्करांवर तब्बल 92 लाख 65 हजार 800 रु.दंड

आज (28 मे ) ला अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या मन्नू लिल्हारे रा. तिरोडा याच्या टिप्पर क्र. MH 35 AJ 1999 या वाहनाने 6 ब्रास रेती अवैध्य वाहतूक केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1960 चे कलम 48 (8) अन्वये महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग 4 व दिनांक 12/01/2018 नुसार परिच्छेद 8, 9 व 9.2 नुसार दंडास पात्र आहे.

गैर अर्जदाराने अवैद्य वाहतूक केलेले 6 ब्रास रेतीचे स्वामित्वधन 152400/- व वाहनाचे दंड 200000/- असे एकूण 352400/- रु. दंड गैरअर्जदार मन्नू लिल्हारे याच्या वर तहसीलदार विजय बोरुडे यांनी कार्यवाही केली आहे.

Share