अभंग लेखन : स्त्री तुझे अश्रू
तिच्या आसवांचा! बांध तो फुटला!
कंठ जो दाटला! काळजात!!
असे जीवनात! दुःखाचा डोंगर!
आसवांची धार! आयुष्यात!!
संसाराचा बोजा!घेउनच चाले!
नाही कुणा बोले! नारी जात!!
आयुष्य हे तिचे! चुल आणि मुल!
होईल बदल!आशेवरी!!
नाही अबला ती! ठेवा ह्याचे भान!
द्यावा तिला मान! आतातरी!!
आधुनिक काळ!बदल घडावा!
मोकळीक द्यावा! स्त्रीला जरा!!