पोलीस कस्टडीतील आरोपी मृत्यूप्रकरणात ठाणेदारासह चौघे निलबिंत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शाळेतून 2 वेळा चोरी करणार्या 4 आरोपींना अटक; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया,दि.22: जिल्हयातील मालमत्ता, चोरी घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २० मे रोजी आमगावच्या जिल्हा परिषद शाळेतुन दोन वेळा चोरी करणाऱ्या चार आरोपींना पकडले होते. त्यापैकी मुख्य आरोपी राजकुमार अभयकुमार वैद्य (३०) राहणार कुंभारटोली याच्या २१ मे च्या रात्री आमगाव पोलिस कस्टडीतच मृत्यू झाला आहे.याप्रकरणात प्राथमिक चौकशीच्या आधारावर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी पोलीस निरिक्षकासह चौघांना निलबिंत केले आहे.त्यामध्ये पोलीस निरिक्षक सुभाष चव्हाण,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव जाधव,पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे व पोलीस शिपाई अरुण उईके यांचा समावेश आहे.याप्रकरणात पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचारी यांच्या बयाणावरुन केलेल्या चौकशीत ठाणेदार चव्हाण यांनी कस्टडीमध्ये आरोपी असताना त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष आणि योग्य कर्मचारी यांची न केलेली देखरेख असे अनेक मुध्दे उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात आढळून आल्याने त्यांना तडकाफडकी निलबिंत करण्यात आल्याचे पोलीस प्रसिध्दीप्रत्रकात म्हटले आहे.या सर्वांना गोंदिया पोलीस मुख्यालयात हलविण्यात आले असून मुख्यालय पोलीस उपअधिक्षकाच्या परवानगीशिवाय कुठेही जाता येणार नाही असे म्हटले आहे.आमदार सहसराम कोरेटे यांनीही या प्रकरणात दोषी अधिकारीवर कारवाईची मागणी केली आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती.
यापुर्वी गोंदिया जिल्हा होण्यापुर्वी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात श्यामा काल्या नामक एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोपीची प्रकृती खालावल्याचे ड्युटीवर असलेल्या शिपायाच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली.त्यानंतर सदर आरोपीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.घटणेने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्परपोलीस अधिक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल यांनी सकाळपासूनच आमगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे.