लग्न संभारंभ रद्द, कॅमेरे पण लॉकडाऊन….!

माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला पण आर्थिक मदत कराल काय ? – सुदर्शन लांडेकर छायाचित्रकार देवरी

देवरी, 15-एप्रिल, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले. यामुळे विवाह समारंभ रद्द झाले असून अनेक छायाचित्रकारानचे कॅमेरे ही लॉकडाऊन झाले आहेत. याचा मोठा फटका फोटोग्राफी करणाऱ्याना बसला आहे . यामुळे अनेक छायाचित्रकारांचे कंबरडे मोडले , दररोज च्या उपजीविकेचा प्रश्न खूप गंभीर होत आहे.
छायाचित्रकाराना मदत करण्याची मागणी
प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जवळपास 80 हजार च्या वर छायाचित्रकार असून लग्न समारंभ च्या काळात कोरोना विषाणू मुळे सगळ्यांना घरी बसावे लागले . सर्वांनी लॉकडाऊन ला समर्थन केले आहे, लग्न समारंभ च्या काळात सर्व छायाचित्रकार लग्न समारंभावंर अवलंबून असतात, त्यावर संपूर्ण वर्षाचे नियोजन केले असते छायाचित्रकार हे सामान्य कुटुंबातील आहेत . शासना कडून कोणत्याही प्रकारची फायदे आणि सरकारी कर्मचाऱ्यां सारखं सवलती मिळत नाही,आजच्या वेळेला प्रत्येक छायाचित्रकार
कर्ज काढून नवीन नवीन कॅमेरे आणि लागणारे साहित्य घेऊन बसलेला आहे, आणि काम बंद असल्यामुळे खायचं काय आणि द्यायचे काय अशी अवस्था झाली आहे, फोटोग्राफी जरी जीवनावश्यक नसली तरी आपल्या परिवाराचा पोट भरण्यासाठी काम करणे आवश्यक आहे पण मागील वर्षांपासून स्थिती खुप गंभीर झाली आहे,फोटोग्राफर ला स्वतः जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अनेक अडचणीतुन जावे लागत आहे आधीच फोटोग्राफी संबंधित साहित्य घेण्याकरिता कर्जबाजारी झाला असून असच जर सुरु असेल तर एक दिवस नैराश्य निर्माण होऊन आपल्या परिवारासोबत आत्महत्या करावी लागेल,तरी माननीय मुख्यमंत्री महोदय आपण तरी छायाचित्रकार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर थोडी तरी कृपादृष्टी दाखवून आर्थिक मदत देण्याची कृपा करावी .

Share