तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत पंचशील विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक अव्वल

बोडगांव देवी: अर्जुनी मोरगांव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये पंचशील विद्यालय बाराभाटी येथील विद्यार्थिनी कु. देवयानी दिलीप किरसान आदिवासी गटातून प्रथम क्रमांक पटकाविला, तर शिक्षक गटातून विद्यालयातील गणित तथा विज्ञान शिक्षक ए.डी घानोडे यांचे गणितीय प्रयोग व सादरीकरण तालुक्यातून अव्वल असल्याचे परीक्षकांनी घोषित केले. यामुळे आता हे दोघेही तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यावर करणार आहेत. अध्यापनाची जबाबदारी बरोबर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी धडपडणारे शाळेतील अष्टपैलू शिक्षक एस सी पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीत शिकणारी शाळेची वर्ग प्रतिनिधी कु.देवयानी किरसान या विद्यार्थिनींनी अलीकडे रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मॉडेल तयार करून उत्तम सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांना आकर्षित केले. म्हणून परीक्षकांनी देवयानी या विद्यार्थिनीचा प्रयोग आदिवासी गटातून प्रथम असल्याचे घोषित केले. तसेच गणित व विज्ञान हे विषय उत्तम व सोप्या पद्धतीने शिकवत विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करणारे शाळेतील सहाय्यक शिक्षक ए.डी घानोडे यांनी वेगवेगळी गणितीय क्रिया सोप्या पद्धतीने कसे केले जातात यावर आधारित मॉडेल तयार करून व त्याचे उत्तम रित्या सादरीकरण केल्यामुळे परीक्षकांनी शिक्षक गटातून त्यांचे प्रयोग तालुक्यातून अहवाल असल्याचे घोषित केले. देवयानी किरसान व शिक्षक ए.डी घानोडे यांचे शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला.

Share