बंजारा समाजाचा तिज उत्सव दणक्यात साजरा, संस्कृती जपण्याचा दिला संदेश
देवरी ◾️तिज उत्सव समिती देवरी तर्फे मागील 9दिवसापासुन तिज उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. त्यात महिला भगिनी रोज मऊदार माती मद्ये एक टोपली घेऊन गहू ची पेरणी करतात. आणि नंतर 9दिवस त्याची पूजा करतात व नृत्य सादरीकरण करतात आणि रोज त्या टोपलीत पाणी घालतात नंतर त्या टोपलीतील गहू ची छान अशी वाढ़ होते ही परंपरा बंजारा समाज प्राचीन काळापासुन आपली संस्कृती लोप पाहू नये म्हणून महाराष्ट्र भर तिज उत्सव साजरा करतात तशातच देवरी येथे सर्व विभाग चे कर्मचारी यांनी एकत्र येऊन सलग चार वर्ष पासून हा कार्यक्रम आयोजित करतात. आपली येणारी पिढी यांना या संस्कृती चा विसर होऊ नये म्हणून आपल्या गावापासुन तांड्या पासून दूर राहताना या पिढीने ही संस्कृती विसरू नये हाच महत्वाचा उद्देश तसेच या कार्यक्रमातून एक महत्वाचे म्हणजे गहुची उगवन क्षमता किती दिवसात होऊ शकते असा पण एक वैज्ञानिक दृष्टीकोण या समाजाने पूर्वी पासूनच जपला आहे हे दिसून येते.
सोबतच राधा आणि कृष्णा ची मूर्तीची स्थापणा केली जाते व नवव्या दिवशी मोठ्या जल्लोषात विसर्जन केले जाते त्याच पद्धतीने देवरी येथील बांधवानी 27/08/2024ला विसर्जन केले त्यात या देवरी तांड्याचे नायक गोकुळ राठोड कारभारी प्रकाश चव्हाण निलेश जाधव कमल चव्हाण उमेश चव्हाण हरिदास राठोड अशोक राठोड विष्णू राठोड रवी जाधव अंकुश पवार शिवम राठोड पंकज राठोड दारासिंग राठोड उत्तम नोळे शक्ती चव्हाण सिद्धेश्वर राठोड उमेश आडे योगेश राठोड अरुण जाधव नकुल जाधव निलेश राठोड गोपीचंद चव्हाण मधुकर राठोड किशोर ब्राम्हण मिथुन चव्हाणआदिनी मोलाचे सहकार्य केले.