फसवणूक करणार्या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
गोंदिया◼️ योजनांच्या नावावर भोळ्याभाबड्या आदिवासींची फसवणूक करणार्या 3 भामट्यांना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. सागर पोतनलाल क्षीरसागर (35, रा. परमात्मा, एक नगर गोंदिया), सीमा धवनलाल समरीत (30, रा. गिरोला) व तुलसीदास मेश्राम (35, रा. बोरगाव, कवलेवाडा, गोंदिया) असी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आदिवासींना शासनाच्या योजनांचा लाभ देतो, असे आमिष देऊन त्यांची चक्क फसवणूक केली जात आहे. आदिवासींच्या नावे कर्ज घेत ट्रॅक्टर उचलून तो ट्रॅक्टर दुसर्यालाच विक‘ी करणार्या रॅकेटचा गंगाझारी पोलिसांनी पर्दफास केला आहे. गोरेगाव तालुक्यातील शहारवानी येथील रहिवासी दुलीचंद भैय्यालाल मडावी (45) यांच्या घरी ऑगस्ट 2021 मध्ये तीघे जण गेले. आदिवासी प्रकल्प विभाग देवरी येथील कर्मचारी असल्याचे आरोपींनी सांगीतले. आदिवासी योजनेंतर्गत ट्रॅक्टर मिळवून देतो असे आमिष देत मडावी यांच्याकडून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, सातबारा व फोटो घेतले. आठवडाभरानंतर पुन्हा परत आलेल्या त्या तिघांनी त्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी गोंदियात आणले. गोंदियातील पीकेअर बँकेत त्यांचे खाते उघडले. त्यांच्या सात ते आठ धनादेशावर स्वाक्षरी घेऊन आरोपींनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.fraudsters तीन महिने लोटूनही त्यांना ट्रॅक्टर मिळाले नाही. यावर मडावी यांनी आरोपींना विचारणा केल्यावर आरोपींनी टाळाटाळ केली. 4 मे 2022 रोजी दुलीचंद मडावी यांना पोस्टाने नोंदणी पुस्तक (आरसी बुक) आली. आरसीवर एमएच 35 एआर 4179 क‘मांक नोंद होता. आरोपींनी बँकेकडून कर्ज उचलून दुलीचंद मडावी यांच्या नावाने ट्रॅक्टर खरेदी केला आणि तो ट्रॅक्टर दुसर्यालाच विक‘ी केला असल्याचे यातून उघडकीस आले. यानंतर मडावी पोलिसात तक‘ार देण्यासाठी वारंवार गेले मात्र पोलिसांनी तक‘ार घेतली नाही. अखरे एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या सहकार्याने गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.