शेतक-यांना बि-बियाणे व खतांचा तुटवटा भासू नये- आमदार कोरोटे

■ देवरी येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभेचे आयोजन


देवरी,ता.१२:या खरीप हंगामात सर्व शेतक-यांना फळबागाचे लाभ मिळाले पाहिजे तसेच या हंगामापूर्वी सर्व शेतक-यांच्या जमिनीचे माती परिक्षण झाले पाहिजे. या हंगामात पिक पेरणी पूर्वी शेतक-यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. या सोबतच शेतक-यांच्या बांध्यावर जावून त्यांना पिक लागवड बाबद प्रात्याक्षिक करूण दाखविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शेतक-यांना बि-बियाणे व खतांचा तुटवटा भासू नये. ह्या सर्व बाबी तपासण्याकरीता एक तपासणी पथक तैयार करूण ह्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारची सुचना व निर्देश या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी देवरी तालुक्यातील सर्व कृषी विभागाच्या अधिका-यांना दिले.
आमदार कोरोटे हे देवरी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज बुधवार (ता.१२ जून )रोजी आयोजीत तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा सभेच्या अध्यक्ष स्थावरून बोलत होते.
याप्रसंगी कृषी विभागाचे देवरी उपविभागीय अधिकारी मंगेश वावधने, कृषी अधिकारी बोरकर मॅडम,देवरीचे नायब तहसीलदार लांजेवार साहेब, नाहमुर्ते साहेब,जिल्हा कांग्रेसचे महासचिव राजूभाऊ चांदेवार, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रणजित कासम,कांग्रेसचे किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष जीवन सलामे,माजी पं.स.सदस्य ओमप्रकाश बहेकार,कैलास घासले,बळीराम कोटवार, सचिन मेळे,एकनाथ राऊत यांच्या सह आणि तालुक्याचे सर्व कृषी विभागाचे अधिकारी, कृषी मित्र, कृषी सहाय्यक, तसेच देवरी तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Share