आदिवासी महिलांसाठी सरसावल्या सविताताई पुराम
◼️वैयक्तिक योजनेच्या लाभात निधीची वाढ करण्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्याला दिले निवेदन
देवरी : आदिवासी समाजाचा बहुविध वारसा आणि संस्कृतीचे जतन करत त्यांना सक्षम करणे आणि त्यांचे हित जपण्यासाठी चालना देणे, हे आदिवासी विकास विभागाचे ध्येय आहे. महाराष्ट्रात मूलनिवासी असलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. आदिवासी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबविते. याच हेतूने गोंदिया जिल्हा अंतर्गत सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव हे तालुके नक्षलग्रस्त असून, आदिवासी बहुल क्षेत्र आहेत. या क्षेत्रात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे व त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाकीची आहे. साहित्याची मागणी जास्त असून मागणी पेक्षा निधी कमी मिळत असल्यामुळे लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ मिळू शकत नाही. मागील वर्षी सुद्धा अपुऱ्या निधीमुळे महिला लाभापासून वंचित राहिल्या. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती करिता निधी पुरविला जातो त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती करिता सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावे. निधीमध्ये वाढ झाल्यास महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारना होईल व क्षेत्राचाही विकास होण्यास मदत होईल.
आदिवासी जमातीचा परिपूर्ण विकास होण्याकरीता शासनाने २०२४ ते २०२५ वर्षी योजनेमधील निधीची वाढ करण्यासाठी सविताताई पूराम महिला व बालकल्याण सभापती जि.प. गोंदिया यांनी दिनांक १० जून ला एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय देवरी येथील प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर केले.