भाजपच्या वतीने १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा
संजय पुराम (माजी आमदार, आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्र) व मित्र परिवार यांचे शैक्षणिक उपक्रम
देवरी १६: संजय पुराम (माजी आमदार, आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्र) व मित्र परिवार तसेच भारतीय जनता पार्टी तालुका-देवरी यांच्या वतीने देवरी तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन भाजप कार्यालय देवरी येथे संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी विरेंद्र अंजनकर संघटन मंत्री
आमगाव देवरी विधानसभा माजी आमदार संजय पुराम,
सविताताई पूराम, सभापती महिला व बालकल्यान सभापती जि.प. गोंदिया, प्रमोद संगीडवार, प्रवीण दहिकर तालुका अध्यक्ष, कल्पना वालोदे जि.प. सदस्य, अंबिका ताई बंजार सभापती , अनिल बिसेन उपसभापती, संजू उईके नगराध्यक्ष, प्रज्ञाताई संगिडवार उपाध्यक्ष आदी मंचावर उपस्थित होते.
देवरी तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा, आश्रमशाळा व इतर सर्व शाळेतील इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळामध्ये सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, शाळेतील मुख्याध्यापक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप महामंत्री नितेश वालोदे यांनी केले असून प्रकाश परिहार अध्यक्ष शिक्षक आघाडी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुर्तरुप देण्यासाठी इंदरजीतसिंह भाटिया, राजू शाहू तनुजा भेलावे, अंजू बिसेन यांनी मोलाचे सहकार्य केले .