देवरीच्या उड्डाणपुलाला कित्तेक वर्षापासून मुहूर्त सापडेना, लोकांचे जीव टांगणीला

प्रहार टाईम्स

देवरी◼️ महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला वसलेल्या देवरी शहराच्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. दररोज हजारोच्या संख्येने अवजड वाहनाची रेलचेल देवरी शहरात बघावयास मिळते. देवरी शहर तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे हजारोच्या संख्येत ग्रामीण भागातील लोक कार्यालयीन, शेतीविषयक आणि खाजगी कामानिमित्त येत जात असतात. राष्ट्रीय महामार्गावरील भरधाव वाहनामुळे जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची कसरत सर्व जनतेला परिचयाची आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 6 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. राष्ट्रियमहामार्गावरदेवरीशहरवसलेलेअसूनमुख्य बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये आणिशिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि सर्वसामान्य नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहराच्या मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या अनाधिकृत पार्क केलेल्या ट्रक व जळवाहनांमुळे महामार्गावरून येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. 

कित्तेक वर्षापासून देवरी येथे उड्डाणपुलाची मागणी नागरिक करीत आहेत तरी सुद्धा लोणी खाणारे जनप्रतिनिधी गुंगीची औषध घेऊन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे महिला, विद्यार्थी , वृद्ध नागरिक शहरातील अग्रसेन चौक, अवंती चौक , तहसील कार्यालय , बस स्थानक, धुकेश्वरी मंदिर चौक या परिसरातून रस्ता ओलांडत असतांना भरधाव वाहनामुळे संकटात असल्याचे दिसून येते.

यावर उपाय म्हणून देवरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर उड्डाणपुलाची मागणी शहरातील जेष्ठ नागरिक, सामाजिक संघटना, जनसामान्य नागरिक करीत आहेत.

◼️अनधिकृत पार्किंग वर प्रशासनाचे दुर्लक्ष:

विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला अनधिकृत वाहने पार्क केल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

◼️ सर्विस रस्त्यावर सर्रास अतिक्रमण :

शहरातील सर्विस रस्ते सामान्य नागरिकांना येजा करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत परंतु देवरी शहरातील सर्विस रस्त्यावर सर्रास अतिक्रमण झाल्याचे दिसून येते त्यामुळे वृद्ध नागरिक विद्यार्याचे किरकोळ अपघात दररोज घडत असतांना सबंधित विभाग कारवाई करण्यास गप्प का बसले आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

Share