देवरी चेक पोस्टवर पंटरकडून वसुली, शासनाच्या चिजोरीला चुना

देवरी : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील देवरीच्या सीमा तपासणी नाक्यावर करड्या नजरेतही साखळी पद्धतीने ओव्हरलोड किंवा विना परवाना वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता संबंधित मोटार वाहन निरीक्षकांनी रात्रंदिवस आपापल्या पंटरकडून सोयीस्कररित्या वसुलीचा गोरखधंदा सुरू केल्याची मोठी चर्चा आहे.

देवरी येथील छत्तीसगड सीमेवरील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रशासनानेच या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या करड्या नजरेवर झापडी बसवून बेकायदेशीर वसुली केल्याची चर्चा सध्या जोमात सुरू आहे.

Print Friendly, PDF & Email
Share