दारू पिण्याकरीता पैसे न मिळाल्याने स्वतःला संपवले!

देवरी/ चिचगड: तालुक्यातील चिचगड पोलिस स्टेशन हद्दीतील मृतक आशिष रामचंद घरत वय २२ वर्ष रा. आंभेरा. ता. देवरी हा दिनांक १०/०४/२०२४ चे १८:०० वा.ते २२:०० वा. दरम्यान दारू पिण्याचा सवयीचा आदी झालेला होता. सदर घटनेच्या तारखेला त्याला दारू पिण्या करिता पैसे न मिळाल्याने आपले स्वतःच्या घरी नॉयलॉन रस्सीने फॅन लावायच्या हुक ला गळफास लावुन स्वतःला संपवण्याची घटना घडली असून मरण पावल्याने फिर्यादि रविकांत रामचंद घरत वय ५१ वर्ष रा.आंभेरा ता. देवरी यांचे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे चिचगड येथे अकस्मात मृत्यु क. ०५/२०२४ कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी पोउपनि खासबागे पो.स्टे. चिचगड, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share