4 लाखांचा एवज लांबविणार्‍या दोन महिला जेरबंद

Gondia : एसटी बसने प्रवास करणार्‍या महिलेच्या हँडबॅगमधून रोख रकमेसह सोनेचांदीचे दागीणे लंपास करणार्‍या दोन महिलांना पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातून 10 एप्रिल रोजी दुपारी जेरबंद केले. सोनु रितेश भिसे (30) रा. सतरापुर कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर व सिमा विजय नाडे (53) रा. रामेश्वरी टोली, रिंग रोड, अजनी नाका नागपुर असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 95 हजार 500 रुपये किंमतीचे 76 ग्रॅम 80 मिली वजनाचे सोन्याचे दागिणे, रोख 15 हजार असा 4 लाख 10 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई तिरोडा गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

भंडारा जवळील केसलवाडा येथील फिर्यादी सिमा किशोर ठाकरे (40) या 28 मार्च रोजी एसटी बसने तिरोडा ते धापेवाडा दरम्यान प्रवास करीत असताना दोन अनोळखी महीलांनी त्यांची दागीणे व रोख असलेली हँडबॅग चोरी केली. या प्रकाराची तक्रार सिमा यांनी तिरोडा पोलिसात केली. पोलिसांली अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिस उपनिरिक्षक चिरंजीव दलालवाड यांनी तपासाची सुत्रे स्विकारून गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहकार्याने आरोपिंचा शोध घेत तपासाला गती दिली. बस स्टँड तिरोडा, तुमसर, भंडारा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या चोरी प्रकरणात आंतर जिल्हा चोरी करणार्‍या महीलांच्या टोळीचा सहभाग असल्याचे तपासात दिसून आले. दरम्यान टोळीतील सोनु भिसे व सिमा नाडे यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी चोरी केल्याचे कबून केले.

सोनु भिसे हिच्या घरुन चोरीतील 1 लाख 2 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, 32 हजाराची सोन्याची अंगठी 16 हजाराचे टॉप्स, 20 हजाराचे कानवेल, 7 हजाराची एक सोन्याची अंगठी, 26 हजाराचे कानातील रिंग, 12 हजाराचे सोन्याचे लहान मंगळसुत्र 9 हजार रुपचे रोख असा 2 लाख 24 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. सिमा नाडे हिच्या ताब्यातुन 39 हजाराची सोन्याची चैन, 45 हजार किमतीचा सोन्याचा नेकलेस, 59 हजाराच्या तीन सोन्याच्या आंगठ्या, 5 हजाराचे सोन्याचे पेन्डॉल, 10 हजार रुपयाचे सोन्याचे लॉकेट, 4 हजाराचे सोन्याचा डोरला, 9,500 रुपयाची सोन्याची नथ, 6 हजार रुपये रोख असा 1 लाख 86 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही आरोपींकडुन 3,95,500 किमतीचे 76 ग्रॅम 80 मिली व रोख 15 हजार रुपये, असा 4,10,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखाचे पोलिस उपनिरिक्षक चिंरजीव दलालवाड, सहायक फौजदार मनोहर अंबुले, पोलिस हवालदार दिपक खांडेकर, पोलिस शिपाई सुर्यकांत खराबे, निलेश ठाकरे, नंदा बडवाईक, महिला पोलिस शिपाई सोनाली डहारे, सायबर सेल गोंदियाचे पोलिस हवालदार दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, प्रभाकर पालांदुरकर, रोशन येरणे यांनी केली.

Share