◼️देवरी तालुक्यातील लोहारा येथील घटना
देवरी ११: तालुक्यातील लोहारा येथील महामार्गावर भरधाव टाटा सुमो क्र. MH40KR8901 वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले असून ३००मिटर पर्यंत दुचाकी चिरडत नेली. यामध्ये दुचाकी क्रं. MH35R1941 वरील नंदू टेकाम रा. खमारी गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी वाहनाने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णवाहिका वेळेवर न पोहचल्याने अपघातातील जखमीचा प्रश्न निरुत्तरित आहे.








