ब्लॉसम शाळेत ‘गुढी पाडवा’ मराठी नववर्ष उत्साहात साजरा

देवरी १०: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे गुढी पाडव्याच्या पावन पर्वावर मराठी नववर्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला. 

मराठी संस्कृती आणि मराठी नववर्षाची माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने गुढी पाडवाच्या पर्वावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुजित टेटे , मनीषा काशीवार, कलावती ठाकरे, प्रियांका सलामे उपस्थित होते.

यावेळी गुढी उभारून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्ले ग्रुप , नर्सरी , केजीच्या विद्यार्थ्यांनी मराठी वेशभूषेत कलागुण सादर केला.

Print Friendly, PDF & Email
Share