धुकेश्वरी मंदिरात सर्वधर्म समभावाची हजेरी
देवरी – येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण १३ नोव्हेंबर सोमवारला आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली दीपावली मिलनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्वधर्म समभावाची परंपरा कायम ठेवून शहरातील अनेक धर्मातील, पंथातील आणि राजकीय मंडळींनी उपस्थित राहून एकतेचे प्रदर्शन केले.
यावेळी माजी आमदार संजय पुराम, नगराध्यक्ष संजू उईके, पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे, ज्येष्ठ नागरिक शंकरलाल अग्रवाल, तानबा निर्वाण, गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष परमजीतसिंग भाटीया, मस्जिद समितीचे हाजी वहाब, बौद्ध समाजाचे ॲड. श्रावण ऊके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधेश्याम अग्रवाल, शहर अध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, भाजपचे भंडारा – गोंदिया संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, ज्येष्ठ नेते संतोष तिवारी, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इंदरजीतसिंग भाटीया, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इमरान खान, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते शेखर कनोजीया, नगरसेविका सीता रंगारी, सुनिता शाहू , वैद्यकीय अधीक्षक डॉ. गगन गुप्ता, मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे आणि इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रशांत संगीडवार यांनी मांडले. संचालन कुमारसिंह सोमवंशी यांनी केले असून उपस्थित सर्वांचे आभार सुरेश चन्ने यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सचिव सुशील शेंद्रे, क्षीरसागर गुरुजी, प्रा. मधू शेंद्रे, राजकुमार शाहू, पवन कटकवार, गोविंद अग्रवाल, सुनिल चोपकर, अरुण बनपुरकर, प्रभू मनगटे, दिलीप रोकडे आदींनी सहकार्य केले.