हे काय ! जीवंत व्यक्तिचे बनविले मृत्यू प्रमाणपत्र !
गोंदिया: न्यायालयाने ठोठावलेले दंडाचे पैसे वाचविण्यासाठी जिवंत व्यक्तीला मृत दाखवून त्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करण्यात आले. मात्र मृत दाखविण्यात आलेल्या त्या व्यक्तीलाच पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. 26 एप्रिल रोजी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवित कारावासाची शिक्षा सुनावली. प्रवीण सुभाष गभणे (30) व श्रीकांत भय्यालाल मोरघरे (44) दोन्ही रा. तुमसर जि. भंडारा अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
death certificate 2 ऑक्टोबर 2017 रोजी प्रबंधक जिल्हा न्यायालयातर्फे पोलिस कर्मचारी मेथीलाल ब्रिजलाल भंडारी (48) यांनी शहर पोलिसात दिलेल्या ततक्रारीनुसार, 13 जून 2017 रोजी प्रबंधक जिल्हा न्यायालयात कि‘मिनल अपील क‘मांक 12-2015 मध्ये श्रीकांत भय्यालाल मोरघरे विरुद्ध महाराष्ट्र शासन यामध्ये 14 ऑगस्ट 2017 रोजी अंतिम निर्णय निशाणी क्रमांक 19 प्रमाणे आरोपी प्रवीण गभणे, आरोपी श्रीकांत मोरघरे यांना 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात प्रबंधक जिल्हा न्यायालय यांच्याविरुद्ध आरोपी प्रवीण गभणे याने अपील केले होते. मात्र अपिलासाठी आरोपी श्रीकांत मोरघरे हा गैरहजर होता. त्यावर आरोपी प्रवीण गभणे याने आरोपी श्रीकांत मोरघरे याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. मात्र श्रीकांत हा जिवंत असल्याने पोलिसांनी त्यालाच न्यायालयात हजर केले. आरोपी प्रवीण गभणे याने खोटे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्यामुळे या प्रकरणात दोघांवर कलम 420, 468 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणावर शुक्रवारी निर्णय दिला. आरोपी प्रवीण गभणे व श्रीकांत मोरघरे यांना पाच वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक नार्वेकर यांनी केला तर युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, शिपाई रामलाल किरसान यांनी सहकार्य केले.