१ मे पासून बँकेचे नियम बदलणार !

मुंबई : १ मे पासून बँकांचे अनेक नियम बदलणार असून यामध्ये वेगवेगळ्या बँकांचा समावेश आहे. या बदललेल्या सर्व नियमांमुळे तुमच्या खिशाला झळ बसू नये म्हणून कोणते नियम बदलले आणि नवीन नियम कोणते लागू झाले आहेत हे माहित असणे महत्वाचे आहे.

१ मे पासून सिलेंडरच्या किमती तसेच बँकेच्ये व्यवहार यांमध्ये नवीन नियम लागू होणार आहे. आर्थिक वर्षातला नवीन महिना सुरु होणार असून सामान्य नागरिकांना समस्या येऊ शकते. तर अनेक गोष्टी येणाऱ्या १ मे ला बदलणार आहे. कोणत्या बँकांचे नियम बदलणार तसेच नवीन नियम काय जाणून घेऊ या.

आयसीआयसीआय बँक –

आपल्या सेवाशुल्कात नवीन बदल आयसीआय बँकेने केला आहे. तसेच पासबुक सेवेसाठी काही शुल्क या १ मे पासून द्यावे लागेल. तसेच ग्रामीण भागातील लोकांना डेबिट कार्डसाठी प्रत्येक वर्षी ९९ शुल्क द्यावे लागतील तर शहरातील नागरिकांना २०० शुल्क द्यावे लागतील. तसेच २५ चेक, चेकबूकचे निशुल्क राहतील.

आयडीएफसी बँक-

आयडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने बील देणे महागणार असल्याने जर तुम्ही वीजबिल, फोन बिल केबल बिल, इंटरनेट बिल पाणी बिल हे जर तुम्ही क्रेडिट कार्डने करीत असाल तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील. आयडीएफसी बँकेने देखील नियमांत बदल केले आहे.

एचडीएफसी बँक –

एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील एक महत्वाची अग्रणी बँक आहे. एचडीएफसी बँकने देखील आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहे. एफडी योजनेच्या गुंतवणुकीसाठी तारिख या बँकेने नागरिकांसाठी वाढवली आहे. तुम्ही १० मे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. २०२० मध्ये या योजनेची सुरवात झाली होती. नागरिकांना अधिक व्याज मिळेल जर या योजनेमध्ये गुंतवणूक कर केली.

येस बँक-

आपल्या नियमांमध्ये काही बदल १ मी पासून येस बँकेने देखील केले आहे. कमीत कमी ५० हजार रुपये प्रो मॅक्स खाते असणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात ठेवावे लागणार आहे. कमीत कमी २५ हजार रुपये प्रो प्लस बचत खात्यात ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. तसेच १० हजार रुपये प्रो बचत खात्यात ठवावे लागणार आहे. प्रतिवर्षी २९९ रुपयांचे शुल्क एलिमेंट डेबिट कार्डसाठी द्यावे लागले. एक्सप्लोअर डेबिड टार्डसाठी ५९९, एंगेज कार्डसाठी ३९९, तर डेबिट कार्डसाठी शेतकरी वर्गाला १४९ रुपये द्यावे लागणार आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share