गोंदियातील 18 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा होणार गौरव

गोंदिया: उत्तम कामगिरी, उल्लेखनीयय, प्रशंसनीय सेवेबद्दल जिल्हा पोलिस दलातील 18 पोलिस अधिकारी, अंमलदार यांचा सन 2023 साठी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. यासंबंधिचे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक यांनी 25 एप्रिल रोजी जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातर्फे पोलिस दलात कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचा संमानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव केला जातो. सन 2023 वर्षासाठी गोंदिया जिल्हा पोलिस दलातील 18 अधिकारी, पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तिरोडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ कदम, पोलिस उपनिरिक्षक रोशन खांडेकर, जितेंद्र मिश्रा, पोलिस कर्मचारी उमेश मलखांबे, प्रेमदास होळी, ज्योती मरकाम, विनोद कुंभरे, पुनम हरीणखेडे, शैलेश राऊत, उमेश मंडारे, कैलाश शहारे, विकास माने, निकलेश वासनिक, धिरज दुबे, लिलाधर चुटे, महेश वलथरे आणि राहुल सावरकर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या दिवसांत पार पडणार्‍या सोहळ्यात सर्वांना पोलिस सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविले जाणार आहे. सर्व पोलिस अधिकारी अंमलदार यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share