गोठानपार हत्याकांडःनुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या 4 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात

देवरीः सात दिवसापासून जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना देवरी तालुक्यातील गोठानपार येथे ता.१६, रोजी घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती. पोलीस प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला होता अखेर सातव्या दिवशी पोलिसांना तपासात यश आलं असून चार अल्पवयीन शाळकरी मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी दिली. गोठानपार येथे ता.१६ रोजी लग्नकार्यात सहभागी झालेल्या सहाव्या वर्गातील बारा वर्षाच्या मुलीवर अज्ञात इसमांनी जंगलात नेऊन विवस्त्र करत अत्याचार केला. आणि दगडाने ठेचून निघुण हत्या केल्याची घटना ता.२० रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना ५ ते ६ दिवस लोटूनही तपासाला यश मिळत नसल्याने नागरिकांकडूनही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात होते.

अखेर सातव्या दिवशी पोलिसांनी तपासाची दिशा फिरवली. आणि आदिवासी आश्रम शाळा कडीकसा येथे एकाच शाळेत शिकत असलेल्या चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं हे प्रकरण मृतक चिमुकलीच्या शाळेतीलच वर्ग बारावीची नुकतीच परीक्षा दिलेल्या मुलांकडून घडवून आनल्याची चर्चा केली जात होती. अतिशय दुर्दैवी घटना आणि त्यातही अल्पवयीन मुलांकडून झालेला हे प्रकरण समाजात वाढलेली विकृतीची ओळख करून देत आहेत. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे या घटनेमुळे जनमानसात विशेषतः महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त केली जात आहे.” या प्रकरणाला घेऊनच आज ता. २७ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती सादर करणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खडबड उडाली, चारही अल्पवयीन मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी दिली.”

Print Friendly, PDF & Email
Share