कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत एमपीएससी उत्तीर्ण तरुणाचा संकेत देवळेकर यांच्याहस्ते गौरव
देवरी ◼️ “कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून” उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आदिवासी नक्षल भागातील यशस्वी तरुणाचा केला गौरव केला . राजश्री शासकीय विद्यालय कडीकसा,येथील शिक्षिका नंदेश्वर मॅडम यांचा मुलगा स्वप्निल वालदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ‘सहाय्यक आयुक्त मस्य विभागामध्ये निवड झाल्याने त्यांच्या या यशाबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सदर विद्यार्थी स्वप्निल वालदे यांना व त्यांच्या परिवाराला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी येथे बोलावून सत्कार व गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आदिवासी भागातील युवकांसाठी स्वप्निल हा युवक प्रेरणादायी ठरेल त्याने अतिशय संघर्ष करून ही झेप घेतली आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी युवकांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत, जिद्दीने, प्रामाणिक पणे जर अभ्यास केला तर काहीच अशक्य नाही, आपण पुण्या, मुंबई च्या झगमगाटात न राहता आपल्या निसर्ग रम्य गडचिरोली गोंदिया च्या दर्या खोर्यात राहून आकाशाला गवसणी घालू शकतो हे स्वप्निल वालदे या युवकाने दाखवून दिले आहे.
संकेत देवळेकर यांनी या भागातील युवक व युवती यांना आवाहन केले आहे की ज्यांना खरोखरच अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी कसलीही मदत लागली तर गोंदिया जिल्हा पोलीस आपल्यासाठी सदैव तत्पर आहे असे आवाहन करून जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण कसे होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी गरज पडल्यास ऑनलाईन पद्धतीचा वापर करून घेतला जाईल असे आश्वासन दिले.