सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

गोठणगाव ◼️ सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव व रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट यांचे संयुक्त विद्यमाने दादालोरा एक खिडकी योजनेच्या माध्यमातुन नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२४/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजता पर्यंत मौजा गोठणगांव व बोंडगांव येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन गोटणगांव, बोंडगांव व केशोरी परीसरातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन सदर शिबीराचा लाभ घेण्याबाबत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम निखील पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कँप देवरी, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

CS

Print Friendly, PDF & Email
Share