सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

गोठणगाव◼️सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दि. २०/०९/२०२३ रोजी मौजा उमरपायली येथील जि.प. प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांकरीता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेकरीता नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-३ शोध मोहीमेवर आधारित चित्र काढण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद दिला.

नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कल्पनाशक्ती तसेच त्यांच्यातल्या कला कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरवेळी आर.एस. मांढरे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्जुनी/मोर व सत्यवान – शहारे, गटसमन्वयक गट साधन केंद्र पंचायत समिती अर्जुनी/मोर तसेच सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सपोनि. सचिन घाटे सा., पोउपनि शुभम नवले सा. व पोहवा. राजेश पुराम, सतिश भोवते, देवेंद्र थेर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share