तालुकास्तरीय गोळा फेक आणि रनिंग स्पर्धेत ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

◼️क्रीडा संकुल देवरी च्या क्रीडांगणावर पार पडली स्पर्धा

देवरी ◼️तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच झालेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय ४०० मी. रनिंग आणि गोळा फेक स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.

जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ब्लॉसम स्कूलचे आयुष घोडेश्वार आणि नितीन भोयर यांनी अव्वल स्थान मिळवला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर विद्यार्थी क्रीडा शिक्षक अजित टेटे आणि राहुल मोहरले यांच्या नेतृत्वात स्पर्धेत सहभागी झालेले होते. यावेळी सर्व सहभागी आणि विजयी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share