नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

◼️नगरपंचायत नगरसेविका तनुजा भेलावे यांच्या सह गणेश भक्तांनी केलं रक्तदान

देवरी 23: देवरी चा राजा म्हणून ओळख असलेल्या राज्यशासन पुरस्कृत नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी यावर्षी 55 वे वर्ष साजरे करीत आहे . त्यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरात नगरपंचायत नगरसेविका तनुजा भेलावे यांच्या सह मंडळाचे अध्यक्ष दिनेश भेलावे , संजय बळगाये, माया निर्वाण, निखिल शर्मा , प्रमोद निखाडे, डॉ. सुजित टेटे, रवी भोयर, किशोर बगळे, अजित बघेले, आदी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व जपले.

सदर शिबिराच्या यशासाठी मंडळाचे पदाधिकारी ,महिला यांनी मोलाचे सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share