अखेर फत्तेपूर-ढाकणी रस्ता बांधकामाला होणार सुरूवात धनंजय रिनायत यांच्या पाठपुराव्याला यश

गोंदिया : गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रात मोडत असलेला फत्तेपूर-ढाकणी रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे नागरिकांना गोंदिया शहरात दाखल होण्यासाठी १० ते १५ किमी अंतराची पायपीट होत असे. या संदर्भात भाजप कार्यकर्ता धनंजय रिनायत यांनी वारंवार पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता यांच्याशी पाठपुरावा केला. तसेच आ.विनोद अग्रवाल व आ.विजय रहांगडाले यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याची समस्या मांडली. त्याचप्रमाणे खा.सुनिल मेंढे यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून रस्ता बांधकामाची मागणी केली. रिनायत यांच्या पाठपुराच्याची दखल घेण्यात आली असून फत्तेपूर-ढाकणी रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ ते १० दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून दिवाळीपूर्वी रस्ता बांधकामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती संबधित विभागाने दिली आहे.
फत्तेपूर-ढाकणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे गोंदिया शहराचे अंतर लांबले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अवघ्या ६ ते ८ किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरात जाण्यासाठी १० ते १२ किमीचे अंतर कापावे लागत होते. यामुळे नागरिक, विद्यार्थी व शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत होती. या बाबीला घेवून भाजप कार्यकर्ता धनंजय रिनायत यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता पी.टी.देशमुख आणि अभियंता तुरकर यांच्याशी सतत पाठपुरावा केला. आ.विनोद अग्रवाल व आ.विजय रहांगडाले यांच्याकडू पाठपुरावा करून सदर समस्या लक्षात आणून दिली. त्याचप्रमाणे खा.सुनिल मेंढे यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार करून रस्ता बांधकामाची मागणी केली. यावर उपअभियंता देशमुख आणि तुरकर यांनी लवकरात लवकर रस्ता तयार होणार, असे आश्वासन दिले होते. तर दोन्ही आमदारांनीही या संदर्भात ठोस पाऊल उचलत पुढाकार घेतला. यामुळे रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. ८ ते १० दिवसात टेंडर प्रक्रिया आटोपून दिवाळीपूर्वी रस्ता बांधकामाला सुरूवात होणार, असे आश्वासन संबधित विभागाने दिले आहे. फत्तेपूर-ढाकणी रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत करण्यात आला असून या योजनेच्या माध्यमातून रस्ता बांधकाम होणार आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून निर्माण झालेली फत्तेपूर-चुटिया रस्त्याची समस्या मार्गी लागणार आहे. नागरिकांना होणारी रस्त्याची अडचण दूर झाल्यामुळे आ.विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, ग्राम सडक योजनेचे उपअभियंता देशमुख, तुरकर यांचे आभार मानले.
०००००००

Print Friendly, PDF & Email
Share