देवरी येथे भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव थाटात साजरा

देवरी: भगवान विष्णूचे सहावे अवतार चि. भगवान श्री. परशुराम यांचा जन्मोत्सव देवरी येथे सर्वभाषी ब्राह्मण महासभा देवरी तालुक्याच्या वतीने शनिवार (ता.२२ एप्रील) रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या निमित्य मनीष शर्मा यांच्या शितला माता रामायण भजन मंडळ आमगावच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देवरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागा (राज्य) च्या विश्राम गृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरगाव बाजार चे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक उमाशंकर शर्मा होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आमगावचे प्राध्यापक विनायक अंजनकर व देवरीचे सामाजिक कार्यकर्ता संतोष तिवारी हे उपस्थित होते. यावेळी ब्राम्हण महासभाचे चे तालुकाध्यक्ष दीपक शर्मा, उपाध्यक्ष विरेंद्र अंजनकर, सचिव संजय भागवतकर, कोषाध्यक्ष गोपाल तिवारी, प्रवक्ता लल्लन तिवारी, युवाध्यक्ष निखिल शर्मा, महिला अध्यक्ष मीनाक्षी शर्मा, माजी सचिव नंदूप्रसाद शर्मा, मधू पालिवाल, सुरेश(पप्पू) शर्मा, महिला कार्यकर्ते वनिताताई राजनकर, विमलाबाई जोशी,कमलेश पांडे, सौरभ शर्मा,आमगावच्या शितला माता रामायण भजन मंडळाचे मनीष शर्मा व त्याची चमू यांच्या सह ब्राम्हण समाजातील महिला, पुरुष व युवावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
सर्वप्रथम चि. भगवान श्री परशूराम यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुजा अर्चना करण्यात आले. दरम्यान १० वीच्या बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविणारे समाजाचे एकांशू नंदूप्रसाद शर्मा व वैभवी संजय भागवतकर यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आले.
. या प्रसंगी प्रा. विनायक अंजनकर व संतोष तिवारी यांनी समाजाला भगवान परशूराम यांच्या जीवना विषयी मार्गदर्शन करूण समाजाच्या सर्वांगिन विकासाकरिता एकनिष्ठेने कशा प्रकारे कार्य करून समाजाला पुढे नेण्याचे काम करता येईल या विषयी अमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शर्मा यांनी तर संचालन गोपाल तिवारी यांनी आणि उपस्थितांचे आभार लल्लन तिवारी यांनी मानले.

Share