ब्लॉसम स्कूलमध्ये महिला सशक्तीकरण विषयावर कार्यशाळा संपन्न

नागरी सांस्कृतिक व पर्यटन बहुउद्देशीय संस्थाच्या सौजन्याने कार्यशाळा

देवरी: स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे महिला सशक्तीकरण या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अंकिता रूईया, प्रमुख अतिथी म्हणून नकुल रूईया , वैशाली मोहुरले, सरिता थोटे, सुनील पारधी आणि जांभुळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात महिला सशक्तीकरण विषयावर दिलखुलास चर्चा करण्यात आली असून महिला स्वयं रोजगार, गृह उद्योग आदि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले असून शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते .

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें