नगरपंचायत देवरी येथे नगर विकास दिन साजरा

देवरी◼️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्यापैकी एक राज्य असून राज्यातील शहरीकरण वाढीचा वेग प्रचंड आहे. त्यामध्ये देवरी नगर पंचायत एक असून नागरीकांना उत्तम सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहे. 74 व्या घटना दुरुस्तीमुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना घटनात्मक स्थान मिळाले आहे.

74 व्या घटना दुस्तीचा अंमल 20 एप्रिल 1993 पासून सुरु झाल्याने शासनातर्फे सदर दिवस नगर विकास दिन म्हणून साजरा केला जात आहे. यावर्षी नगर पंचायत देवरी तर्फे 20 एप्रिल 2023 रोजी देवरी शहरात रॅलीव्दारे नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगरपंचायत कार्यालय देवरी हद्दीतील रॅलीचा मार्ग नगर पंचायत कार्यालय देवरी – कारगील चौक दुर्गा चौक—राणी दुर्गावती चौक – नगर पंचायत कार्यालय देवरी असा होता.

यावेळी नगरपंचायत देवरीचे समस्त नगरसेवक, नगराध्यक्ष , मुख्याधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share