गोंदिया जिल्हात आरटीईच्या 864 जागांसाठी 3959 अर्ज

गोंदिया◼️ शिक्षण हक्क कायदा अंतर्गत नामांकीत खासगी इंग‘जी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर गरीब, वंचित व दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक सत्र 2023-24 करिता 1 ते 25 मार्चदरम्यान पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. जिल्ह्यातील 864 जागांसाठी 3959 अर्ज केले. पहिली सोडत (लॉटरी) बुधवार 5 एप्रिल रोजी पुणे येथे विद्यार्थ्र्यांच्या हस्ते काढण्यात आली. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना बुधवार 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेनंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क‘मांकावर संदेश (एसएमएस) पाठविले जाणार आहे.

आरटीई (RTE) अंतर्गत शैक्षणिक सत्र 2023-24 करिता गोंदिया जिल्ह्यात 131 शाळांमध्ये 864 जागा निर्धारीत आहेत. त्यासाठी 3 हजार 959 ऑनलाईन अर्ज सादर झाले होते. गतवर्षी जिल्ह्यात 842 जागा राखीव होत्या. बुधवार 5 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण व क‘ीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह विविध शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी, पालक, पत्रकार उपस्थित होते. लॉटरीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना येत्या बुधवार 12 एप्रिलपासून संदेश (एसएमएस) प्राप्त होतील. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी 13 ते 25 एप्रिल दरम्यान पंचायत समिती, नगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेत त्यांच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी 30 एप्रिलपर्यंत शाळेत जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा लागेल. आरटीईअंतर्गत प्रवेशित बालकांना कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये वेगळी/सापत्न वागणूक दिली जाणार नाही किंवा त्यांच्याबद्दल भेदभाव केला जाणार नाही, याबाबत दक्षता शाळा प्रशासनाने घेणे अनिवार्य आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. तसेच सदर बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याचे सामाजिक दायित्व शाळा प्रशासनाचे राहील. याबाबत पालकांची तक‘ार आल्यास तक‘ार निवारण समितीकडे तक‘ार करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण विभागाने केले आहे.

तालुकानिहाय शाळा, जागा व प्राप्त अर्ज

तालुका           शाळा           जागा           अर्ज

आमगाव           11               89               407

देवरी                 07              46              124

गोंदिया              50             354             2025

गोरेगाव             15              60               306

स. अर्जुनी          10             48                176

सालेकसा          05             44                 117

अर्जुनी मोर        13             88                124

तिरोडा 20 135 622

Share