देवरी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

देवरी ◼️ हनुमान जयंती निमित्त देवरी येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ६ एप्रिल रोजी करण्यात आले होते. देवरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथील श्री हनुमान मंदिरात हनुमान चालीसा १०८ पाठ सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले होते. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित दर्शवून सायंकाळी आरतीनंतर महाप्रसाद चा लाभ घेतला. यावेळी हनुमान भक्तांनी बाईक रैली काढून जय श्री राम चा जयघोष करीत आपला सहभाग दर्शविला.

Print Friendly, PDF & Email
Share