त्या अपघातातील ट्रक चालकावर गुन्हा दाखल

देवरी ◼️ पार्सल बॉय च्या अपघातातील मृत्यू प्रकरणी देवरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. दि. ०३/०४/२०२३ चे १३/०० वा. ते १३ / ३० वा दरम्यान मृतक दिनेश कुंडलीक बहेकार वय २८ वर्ष रा परसोडी / सडक हा पार्सल वाटप करण्याकरीता आपली मोटार सायकल क्रमांक एमएच ३५/एम–९६१४ नी जात असतांना ट्रक कं- जेएच-१० / सीजे -२००६ चा चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगात, हयगयीने, निष्काळजीपणे लापरवाहीने चालवुन, दिनेश कुंडलीक बहेकार वय २८ वर्ष रा परसोडी/सडक यास मागेहुन धडक देवुन, जखमी करून, अपघाताची खबर कोनासही न देता जखमी ला उपचाराला न नेता पडुन गेला व त्याच्या मरणास कारणीभुत झाल्याने फिर्यादी मंगेश कुंडलीक बहेकार वय २८ वर्ष रा परसोडी / सडक च्या रिपोर्ट वरून व प्राप्त डॉक्टरी कागदपत्रावरून पोस्टे देवरी येथे अप क. ९५/२०२३ कलम २७९, ३०४ (अ) भादवी सहकलम १३४ (अ), (ब),१८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि घाडगे पोस्टे देवरी, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share