गोंदिया जिल्ह्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
महाराष्ट्र – छत्तीसगडसीमावर्तीगोंदियाजिल्ह्यातीलपो. ठाणेसालेकसाअंतर्गतलालघाटीतेटाकेझरीजंगलभागातपोलीसपथकआणि – नक्षलवादीयांच्यातचकमक, गोळीबार
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील टकेझरी जंगल पहाडी परिसरात शुक्रवारी (दि.७) सायकांळी पोलिसांसोबत नक्षल्यांची चकमक झाली. या चकमकीत एक ते दोन नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुरकुटडोह आऊटपोस्ट अंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेवरील दक्षिणपूर्व भागात आऊटपोस्टपासून तीन किलोमीटर अंतरावर ही चकमक झाली.
भारत सरकार व्दारे प्रतिबंधीत असलेली माओवादी- नक्षलवादी संघटना दरवर्षी जानेवारी ते जुन यादरम्यान टि.सी.ओ.सी.कालावधी पाळून या कालावधीत प्रशासना विरुद्ध बंड पुकारून देशविघातक कृती, विविध घातपाती घटना, विध्वसंक कृत्य घडवुन, जनमाणसात दहशत पसरवून आपला वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि अश्या दहशतवादी कारवायामुळे देशातील अंतर्गत सुरक्षेकरीता मोठा धोका निर्माण झाला आहे.
1) एक काळया रंगाची गणवेशावरील टोपी ज्यास पाठी मागील बाजुस स्टील ची क्लीप असलेली जुनी वापरती. कि.00/- रू. 2) एक निळया रंगाचा रुमाल पांढया चौकटीचा कि.00/- रुपये3) एक जोड काळया रंगाचा परागोन कंम्पनीची जुनी वापरती कि.00/- रुपये असे साहीत्य मिळुन आले.
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील जंगलात सहा ते सात नक्षली शिरत असल्याचे सर्चिंगवर असलेल्या गोंदिया पोलिसांच्या पथकाला दिसताच नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. पोलिस पथकाद्वारे करण्यात आलेल्या गोळीबारात एक-दोन नक्षलवादी जखमी झाले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अंदाजे २० ते २५ मिनीटे गोळीबार सुरु होता. पोलिस पथकाचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जोरजोराने ओरडत घनदाट जंगलाचा फायदा घेत छत्तीसगड राज्याच्या सिमेलगतच्या भागाकडे पळून गेले. सालेकसा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे सालेकसा येथे आज दिनांक 08.04.2023 रोजी पहाटे विशेष अभियान पथकाचे पो. उप. नि. श्री. पठाडे यांचे तक्रारी वरून भारत सरकारद्वारे प्रतिबंधित केलेल्या सशस्त्र नक्षल दलमचे अज्ञात नक्षलवादी यांचे विरुद्ध गुन्हा क्र. 90/ 2023 कलम 307, 353, 141, 143, 144, 147, 149, 120 ब, 114 भादवी, सहकलम 3/27 भारतीय हत्यार कायदा 1951 सहकलम 10, 16 ब, 18, 20, 23 बेकायदे शिर हालचाल प्रतिबंधक कायदा 1967 अन्वये दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री. विजय भिसे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा नक्षल विरोधी विशेष अभियान पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार, छत्तीसगड राज्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार व मध्यप्रदेश राज्याचे हॉक्स फोर्स चे अधिकारी अंमलदार यांनी केलेली असुन मा. वरिष्ठांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.