मासुलकसा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

देवरी 18 : पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मासुलकसा घाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती आणि चार वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावले असल्याचे वृत्त आहे.

घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव दुर्गा वर्मा असे असुन सदर महिला आपल्या पती व मुलासोबत आज सकाळी नागपूरवरून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे जाण्यासाठी निघाले होते.मासूलकसा घाटात पोहचताच एका अज्ञात ट्रक चालकाने यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिल्यानंतर बाईकचे संतुलन बिघडल्याने सर्व बाइकसह खाली कोसळले. बाइकवर मागे बसलेल्या दुर्गा वर्मा या खाली पडल्यामुळे ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

घटनास्थळी वर्मा हे आपल्या चिमुरड्या चार वर्षाच्या मुलासह टाहो फोडत असल्याचे पाहून उपस्थित लोकांच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत असून फरार ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share