एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, सायंकाळी शपथविधी होणार

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.”

देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, “गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे. एकीकडे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्र्याला मंत्रिपदावरून काढण्यात आलं नाही. शेवटच्या दिवशी जाता जाता या सरकारने संभाजीनगर हे नामांतर केलं. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घेता येत नाही, पण ती घेतली.”

  • एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना ५६ जागा जिंकली. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म ज्यांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीला मत दिले नव्हते. भाजप युतीला दिले होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. आमच्याच मतदार संघात हरलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल, तर कशाच्या जोरावर लढायचा हा प्रश्न शिवसेना आमदारांसमोर होता. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती तोडा, असा निर्णय आमदारांनी घेतला. मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आमदारांऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राधान्य दिले.
  • देवेंद्र फडणीस म्हणाले की, उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही महाराष्ट्राला अल्टरनेट गर्व्हमेंट देतोय. तसा शब्द आम्ही पूर्वीच दिला होता. शिवसेनेचा एक गट, अपक्ष आमच्यासोबत आहेत. तसे एक पत्र राज्यपालांना दिले आहे.
  • देवेंद्र फडणीस म्हणाले की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. ही तत्त्वाची आणि हिंदुत्वाची लढाई आहे.
Print Friendly, PDF & Email
Share