5 व्या राष्ट्रीय युथ गेम्समध्ये देवरीच्या योगा स्पोर्ट्स अकादमीचे सुयश

देवरी 27- नुकतेच भंडारा, तुमसर येथे घेण्यात आलेल्या 5 व्या राष्ट्रीय युथ गेम्समध्ये देवरीच्या योगा स्पोर्ट्स अकादमीचे 3 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले असून ही आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. योगा स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक रोहित ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनात सादर विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते.

सवर्ण पदक विजेत्यामध्ये तेजस मते TRADITIONAL INDIVIDUALE YOGA, देवशीष मारबते- RYTHAMIC YOGA, भव्य दोनोडे ARTISTIC YOGA EVENT सदर योगा मध्ये सुवर्ण पदक मिळवून तालुक्याचा नाव लौकिक केला आहे . सुवर्ण पदक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील आणि योग मुख्य प्रशिक्षक रोहित ब्राम्हणकर यांना दिलेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share