सुभाष भैय्याजी दुबे यांची सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा च्या मुख्याध्यापक पदावर नियुक्ती

देवरी 01: देवरी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे सुभाष भैय्याजी दुबे यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी देवरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती कमलादेवी स्वरुपचंद जैन कन्या हायस्कुल व महाविद्यालयात सुभाष दुबे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आता पर्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
यांची नियुक्ती 1995 साली सदर शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर करण्यात आलेली होती. गणित विषयातील प्रभुत्वामुळे गणित विभागाची जबाबदारी यांच्या खांद्यावर होती.

मनमिळावू स्वभाव , गणित विषयावर प्रभुत्व , शालेय व्यवस्थापनाचे आणि प्रशासनाचे उत्तम अनुभव बघता सुभाष दुबे यांची नियुक्ती याच संस्थेच्या सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा येथे मुख्याध्यापक पदावर करण्यात आली आहे.

आज सदर शाळेत यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डीलनसिंह पवार, कोषाध्यक्ष भुवनेश्वरसिंह पवार, शिक्षक डी एस सोनाग्रे, एन एल नाईक, अल्का दुबे, शहनाज मिर्जा, प्रियांका लटये, योगेश्वरी कांबळे व सर्व शिक्षक , कर्मचारी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर पदभार स्वीकारल्यानंतर मित्र परिवार , कौटुंबिक मंडळी यांनी अभिनंदन केलेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share