राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मेळावा संपन्न


प्रतिनिधी/पवन के.निरगुळे

लाखनी25: राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखणी द्वारा समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांच्या स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष अल्लाद भंडारकर प्रमुख अतिथी म्हणून डॉ परिणय फुके खासदार सुनील मेंढे आणि प्रमुख वक्ते म्हणून पदवीधर उमेदवार संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेच्या वाटचाली पासून शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनी कर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून दिवाकर जोशी यांनी काम केले आणि म्हणूनच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री देण्याचे कार्य बापूसाहेबांनी केले यासोबतच बापू साहेबांचे आणि दिवाकर जोशी यांचे घनिष्ठ स्नेहाचे नाते होते असे बोलत संदीप जोशी यांनी एक डिसेंबर रोजी होणाऱ्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. शिक्षण महर्षी बापूसाहेब लाखनी कर यांनी शाखा आणि शाळा यासोबतच परिसरामध्ये विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळावे यासाठी शाळा सुरू केली असून तालुक्यातील 90 टक्के विद्यार्थी हे याच शिक्षण संस्थेतील पदवीधर झाले असून निश्चितच या निवडणुकीमध्ये संस्थेच्या मोठा फायदा होईल असे मत संस्थाध्यक्ष आल्हाद भंडारकर यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्थेतील विविध घटक संस्थेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अक्षय मसुरकर यांनी तर आभार बाबुराव निखाडे यांनी व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share