युवा छात्र संसदेत निखिल बन्सोड यांची निवड

देवरी: तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथिल निखिल बन्सोड , नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया यांची युवा छात्र संसदे करीता निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शताब्दी वर्षाकडे वाटचाल देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मुल्य रुजवण्यासाठी राष्ट्राप्रती कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा तर्फे दिं२६ आक्टोबर ते ३० आक्टोबर २०२१ रोजी अभिरुप युवा छात्र संसदेचे नागपूर इथे आयोजन करण्यात आले आहे.
दिं२१ आक्टोबर ते २३ आक्टोबर या कालावधीत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात निवड चाचणी म्हणून .
) महिला आरक्षण विधेयक
) भ्रष्टाचार मुक्त भारत
या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या निवड चाचणीत निखिल बन्सोड यांनी आपल्या वक्तृत्व कलेच्या जोरावर भ्रष्टाचार मुक्त भारत या विषयावर भाष्य करत घवघवीत यश संपादन केले आहे. निखिल बन्सोड यांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच युवा जागर महाराष्ट्रावर बोलू काही या युवा छात्र संसदेमध्ये २०१९ ला विधान भवन मुंबई इथे विरोधी पक्षनेते म्हणून निखिल बन्सोड यांनी भुमिका बजावली होती.

पुढील अभिरुप युवा छात्र संसदे करीता निखिल बन्सोड विधान परिषद नागपूर येथे नेतृत्व करणार आहेत ..
निखिल ने आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील , गुरु , शिक्षक मित्रमंडळी यांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share