शाळा सुरू करण्यासाठी आली नियमावली…

मुंबई :येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरु होणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन मुंबईतील शाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. तसेच आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरणार आहेत. तसंच एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असेल. विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मात्र मुंबईतील शाळा कधी सुरू होणार आणि कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु होणार याबद्दलची माहिती मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली. येत्या 4 ऑक्टोबरपासून मुंबईतील शाळाही सुरु करण्यात येणार आहे.

किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, कोरोना व्हायरसचं संकट अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुंबईतल्या शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.असे असतील नियमावली

एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल.

शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल.

सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा भरेल.

शाळेत एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल.

शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असेल.

मास्क घालणे अनिवार्य असेल.

शाळेत सॅनिटायजरचा वापर करणे ही गरजेचे आहे.

महत्त्वाच्या सूचना

शाळा सुरु करण्यापूर्वी आणि शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबनवण्यात याव्यात.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक्‍्लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करून घेण्यात यावे तसेच, इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करुन घ्यावे.

राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या कोरोनासंबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावं.

Print Friendly, PDF & Email
Share