जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माझा व्यवसाय माझा हक्क मालवाहक टेम्पोचे वितरण

भंडारा: जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या फिरत्या व्यवसाया करिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून माझा व्यवसाय माझा हक्क मालवाहक टेम्पो योजनांची मोठ्या उत्साहात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते. आता या योजनेतील सर्व सोपस्कार आटोपून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. संदीप कदम यांच्या हस्ते आज गुरुवार ला साकोली येथे लाभार्थ्यांना मालवाहक टेम्पोचे वितरण करण्यात आले.

त्याप्रसंगी मा. तहसिलदार कुंभरे साहेब, मा. संतोषजी पवार साहेब, एम.डी. साकोली तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. होमराज पाटीलजी कापगते, मा. राजूभाऊ निर्वाण, अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमेटीची लाखनी सौ. सविताताई ब्राम्हणकर, महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव, मा. आकाशभाऊ कोरे, जिल्हा परिषद सदस्य, लाखनी मा. राजूभाऊ पालिवाल, मा. शेखरजी मेंढे जिल्हा व्यवस्थापक, मा. नगराध्यक्ष सौ. धनवंताताई राऊत, मा. हेमंतजी भारद्वाज, मा.नगर उपाध्यक्ष जगनजी ऊके, मा. छगेद्रजी खोटेले, तालुका समन्वय, मा.राकेशजी भास्कर, मा.मुन्नाजी अग्रवाल, मा.दिपकजी मेंढे, मा.लालचंदजी लोथे, मा.नंदूजी कावळे, मा.उमेशजी भेंडारकर, मा.हरगोविंदजी भेंडारकर, मा.नेपालजी कापगते, मा.सुरेशजी राऊत, मा.भास्कर खोब्रागडे, मा.लिलाधरजी पटले, इत्यादी उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून मिळालेल्या लाभार्थ्यांचे नाव 

1)श्री. मनोज ईश्वरकर, मुरमाडी/सावरी, ता.लाखनी.

2)सौ. सरिता भैसारे, राजेगांव, ता.लाखनी.

3)श्री. महेश सिंगनजुडे लाखनी.

Print Friendly, PDF & Email
Share