लाखनी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण जाहीर


प्रतिनिधी/पवन निरगुळे
लाखनी ११: येथील नगरपंचायत च्या निवडणुकी पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले मंगळवार ला पंचायत समिती सभागृहात जाहीर करण्यात आले.या आरक्षण सोडीनंतर कोणाच्या मनात खुशी तर कुणी नाराज झाला अशी स्थिती इच्छुकांची झाली.
घोषित झालेल्या आरक्षणात प्रभाग क्रमांक 1. अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 2. सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्रमांक 3. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4. नागरिकांचा मागास प्रवर्ग,प्रभाग क्रमांक 5. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6.अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 7. अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 8.नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला,प्रभाग क्रमांक 9. सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10. सर्वसाधारण महिला,प्रभाग क्रमांक 11. नागरिकांच्या प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 12. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 13. नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 14.सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 15. अनुसूचित जमाती महिला,प्रभाग क्रमांक 16 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग,
असे आरक्षण जाहीर करण्यात आले. पीठासीन अधिकारी उपजिल्हाअधिकारी अभिमन्यु बोधवड यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share