तालुक्यातील मच्छिमार व्यवसाय संकटात, मच्छिमारांवर उपासमारीची वेळ

डॉ. सुजित टेटे

देवरी 26: गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रचलित आहे. जिल्हा नैसर्गिक संपत्तेने नटलेले असून जिल्हातील बहुतांश लोक मोलमजुरी , छोटी कामे , शेत मजुरी , मासेमारी , तेंदूपत्ता संकलन करून आपली उपजीविका भागवीत असतात. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे मच्छि मार्केट बंद आहेत आणि त्यातच बाजारही सकाळी 11 वाजता पासून बंद असल्याने मासे विकणाराची अवस्था मोठी बिकट झाली आहे. त्यातच तलावातील पाणी कमी असल्यामुळे मासे अल्प प्रमाणात सापडत आहेत त्यामुळे जिल्हातील मच्चीमार संकटात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

जिल्हातील मोलमजुरी करून पोट भरणारे आदिवासी समाजाचे लोक. जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन , बकरीपालन आणि मच्छिमार व्यवसाय करतात. कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे व्यवसाय करतात परंतु बाजारपेठ बंद असल्यामुळे पकडलेले मासे विकत नाही . सकाळी 7-11 या वेळेत मासे पकडून विक्रीला नेले जाते परंतु ग्राहक मिळत नसल्यामुळे सदर लोकांवर उपासमार आली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

स्थानिक बाजार बंद असल्याने मच्छीमारांचा रोजगार बंद झाल्याने आर्थिक संकट कोसळले आहे मच्छिमार लोक लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.

” दिवसभर मासे शोधूनही अल्पप्रमाणात सापडत असल्याने व मासे विक्रीसाठी बाजार बंद असल्याने मच्छीमार बांधव संकटात सापडले आहेत”
-मच्छीमार

तालुकयातील मच्छिमारांशी माजी जिप सदस्य दीपक पवार यांनी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. मच्छिमार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करणार असे ते यावेळी बोलत होते.

Print Friendly, PDF & Email
Share