पीक कर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांची बँकेत मोठी गर्दी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना चिचगड येथे मंगळवारी दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल काॅपरेटिव्ह बँक लि. च्या चिचगड शाखेत शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याकरिता करिता मोठी गर्दी केली.

प्रहार टाईम्स| भुपेन्द्र मस्के


चिचगड 31: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना चिचगड येथे बुधवारी शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याकरिता मोठी गर्दी केली. आज, बुधवारी दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल काॅपरेटिव्ह बँक लि. च्या चिचगड शाखेत गर्दी उसळली. अशा गर्दीमुळे बँकेतील कर्मचारी व शेतकऱ्यांना कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसामान्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. त्यामुळे या बँकेत अनेक शासकीय योजनांचे पैसे वितरित करण्यात येतात. पीक कर्ज भरण्याकरिताकरिता व नविन कर्जाकरिता सध्या बँकेत गर्दी होत आहे. बुधवारी बँकेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. रखरखत्या उन्हात बँकेचे ग्राहक बँकेबाहेर कामासाठी असतांना बँक प्रशासनाकडून पुरेशी सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्यामुळे बँक प्रशासनाविरूद्ध नागरिकांत आक्रोश दिसुन येत आहे.

जिल्ह्यासह देवरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. बँकेतील कर्मचारी व क्रॉप लोन धारक यांनाही कोरोना संसर्गाची धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांना सेवा देण्याकरिता बँकेची मजबुरी आहे. वेळेत सर्वांचे समाधान करणे आवश्यक आहे. क्रॉप लोन धारकांना वेळेत सेवा देणे आवश्यक आहे. सध्या तापमानाचा पारा वाढला असल्याने बाहेर ऊन व आत गर्दी अशी स्थिती येथे झाली आहे. एकाच वेळी गर्दी झाल्याने बँकेचा नाइलाज आहे. तरीही अपुऱ्या सेवासुविधा व कोरोनाच्या दिशानिर्देशाचे पालन न करणे हे बँक प्रशासनाची लापरवाही असल्याचे दिसून येते.

प्रहार टाईम्सच्या प्रतिनिधींने येथिल ग्राहक व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप राऊत यांचेशी बँक परिसरात बोलतांनी सांगीतले कि “सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींना हिच अडचण जर आली तर प्रश्न आपोआप सुटेल! पण असे होत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर हि बँक चालते त्यांची अडचण समजण्यास लोकप्रतिनिधी अनभिज्ञ आहेत अजून काय?”

Print Friendly, PDF & Email
Share