साकोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे नवनिर्मित पदावर स्थानांतरण

साकोलीतील जनता व सर्वपक्षीय कार्यकर्ते बदली रद्द व्हावी यासाठी आक्रमक

साकोलीला मिळालेली चांगली अधिकारी जाऊ नये यासाठी आ. नानाभाऊ पटोले यांना दिले निवेदन

साकोलीचे सौंदर्यीकरण व विकास करून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शहराचा चेहरामोहरा बदलविला

साकोली, ( 30 मार्च ) : साकोली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची नवनिर्मित पदावर साकोली येथून वर्धा जिल्हा येथे प्रशासन अधिकारी – गट ब, सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. साकोलीचे सौंदर्यीकरण व विकास करून नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शहराचा चेहरामोहरा बदलविला. अनेक विकास कामे केली. त्यामुळे साकोलीतील जनता व सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते सदर बदली रद्द व्हावी यासाठी आक्रमक झाले आहेत. चांगल्या प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकप्रिय असलेल्या मडावी यांची बदली रद्द व्हावी यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा आ. नानाभाऊ पटोले यांना आज ( 30 मार्च ) निवेदन देण्यात आले.

एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक अनुशासनप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मडावी यांनी साकोलीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. एका वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय विकासकार्य केले. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या . मडावी यांच्या प्रभावी उपाययोजना व योग्य नियोजनामुळे साकोली शहरात कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव हा नियंत्रित  राहिला. मडावी यांचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे, याकरिता विविध राजकीय संघटनेच्या माध्यमातून या क्षेत्राचे आमदार, माझी विधानसभा अध्यक्ष, वर्तमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले.

 साकोली नगर परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी माधुरी मडावी यांचे स्थानांतरण प्रशासकीय कारणामुळे झाले असून त्यांची नियुक्ती वर्धा जिल्हा येथे प्रशासन अधिकारी – गट ब, सहाय्यक आयुक्त या नवनिर्मित पदावर करण्यात आली आहे. सध्या साकोली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी पद रिक्त आहे. मडावी यांच्या स्थानांतरनाने त्यांनी हाती घेतलेले विकासकामे प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          साकोली नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर  13 मार्च 2020 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर मडावी यांनी 24 मार्च 2020 रोजी कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले होते, या परिस्थितीला उत्तमरित्या हाताळत मडावी यांनी योग्यरीत्या प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना केल्यात.नागरिकांमध्ये शिस्त आणण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क चा वापर व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली.वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी मडावी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये अमलात आणली. या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मडावी यांनी स्वच्छतेवर भर देऊन शहराचे सौंदर्यीकरण, भाजीपाला लागवड, कचऱ्यातून सोनखत निर्मिती प्रकल्प, उद्यान, आकर्षक कारंजे ,शहरात पार्किंगची सोय ,सार्वजनिक ठिकाणी शौचालय अशी विविध विकास कामे केल्याने साकोली शहराला नवे स्वरूप प्राप्त करून दिले. विशेष म्हणजे अनेक वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावर भरत असलेला आठवडी बाजार हा पटाच्या दानीवर आणल्याने राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडी व अपघात नियंत्रण करण्यात यश मिळविले.

   मडावी यांची प्रशासकीय बदली साकोलीकरांना चटका लावून गेली. हे स्थानांतरण थांबविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटले असून साकोलीकरांनीसुद्धा उपोषणाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात ओबीसी महासंघाचे जिल्हा समन्वयक प्रभाकर सपाटे, तालुका अध्यक्ष उमेश कठाणे ,उपाध्यक्ष डॉक्टर अनिल शेंडे, जिल्हा सचिव सुरेश बोरकर, सहसचिव राधेश्याम खोब्रागडे यांच्यासह विविध पक्षांच्या कार्यकर्ते व साकोलीकरांनी आपल्या सहीनिशी आमदार नाना पटोले यांना मडावी यांचे स्थानांतरण रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share