जि. प .वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे महिला दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे महिला दिनाचे औचित्य साधून दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व महिलांनी भारत देशाच्या प्रगती करिता आपला मोलाचा वाटा उचलला याविषयी माहिती दिली. भारत देशात मा. प्रतिभाताई पाटील मा. इंदिरा गांधी ,पी टी उषा, लता मंगेशकर यांच्या सारख्या कर्तृत्ववान महिलांविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित गावातील सरपंच मा. सौ पंधरे ताई, सौ बिंजलेकर उपसरपंच ,कु. वर्षा वालदे विषय शिक्षिका तसेच गावातील महिला बचत गटाच्या सर्व महिला कार्यकर्ते तसेच एल.बी.तीतराम , संदीप तिडके संचालक ,गजानन पाटणकर अध्यक्ष ,विनोद बहेकार सरचिटणीस, मिथुन चव्हाण , रामेश्वर वाघाडे , तेजराम नंदेश्वर, अरुण सावरकर शिक्षक समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला नंदकिशोर शेंडे, तुषार कोवले, दीपक लांजेवार ,पुरुषोत्तम जनबंधू या सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.


उपस्थित महिलांचे आभार कु. वर्षा वालदे विषय शिक्षिका यांनी मानले

Print Friendly, PDF & Email
Share